1 |
मोफत साइकल वाटप. |
आर्थिकदृष्टा दुर्बल घटकातील इ.८ वी ते १२ वी मध्ये शिकत असलेल्या मुलींना शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मोफत सायकल देण्यात येते.
|
2 |
महिलांना स्वयंरोजगारासाठी मोफत शिवणयंत्र वाटप (योजना क्र.2) |
गरीब महिलांना व्यवसाय सुरु करता यावा. त्यांचे कौटुंबिक उत्पन्नामध्ये वाढ व्हावी हा या योजनेचा हेतु आहे. यामध्ये महिलांना मोफत शिवणयंत्र देण्यात येईल. |
3 |
मुलींना तांत्रिक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य (योजना क्र.3) |
आर्थिकदृष्टा गरीब मुलींना तांत्रिक प्रशिक्षण घेता यावे. या प्रशिक्षणासाठी साहित्य, पुस्तके खरेदी इ.साठी र.रु.2,000/- पर्यंत आर्थिक मदत देण्यात येईल. |
4 |
स्वयंरोजगारासाठी महिलांना संगणक प्रशिक्षण देणे (योजना क्र.4) |
कोणत्याही जाती धर्माच्या महिला व मुलींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या करिता शासनाने निश्चित केलेल्या संगणकीय अभ्यासक्रमाचे (एम.एस.सी.आय.टी. अथवा |
5 |
महिलांसाठी विविध व्यवसाय प्रशिक्षण (योजना क्र.5) |
कोणत्याही जाती - धर्माच्या महिलांना स्वयंरोजगारासाठी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देणे. |
6 |
व्यवसायासाठी हत्यारांचे किट्स घेणेकामी अर्थसहाय्य (योजना क्र.6) |
कोणत्याही जाती-धर्माच्या व प्राधान्याने आर्थिकदृष्टा कमकुवत गटातील तरुण युवतींना व्यवसायांचे प्रशिक्षण घेतल्यास साधन/साहित्यांचा संच घेण्यासाठी र.रु.1.000/- पर्यंत |
7 |
उद्योजकता विकास मार्गदर्शन/प्रशिक्षण शिबिर घेणे (योजना क्र.7) |
गटाने व्यवसाय करावयाचे ठरविल्यास उद्योजकता विकास, सल्ला, मार्गदर्शन इ.साठी नोंदणीकृत महिला संस्थांना/गटांना प्रशिक्षण देणे |
8 |
नोंदणीकृत संस्थांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे(योजना क्र.8) |
नोंदणीकृत महिला संस्थेच्या सभासदांनी व्यवसाय करावयाचे ठरविलेस मिळणार्या कर्ज रकमेनुसार प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येईल. |
9 |
एक वर्ष पूर्ण झालेल्या बचत गटास अर्थसहाय्य देणे (योजना क्र.9) |
ज्या महिलांनी बचत गट सुरु केला असेल व एक वर्ष पूर्ण झाले असेल अशा 10 ते 20 महिला सभासद असणार्या बचत गटास एक वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर जास्तीत जास्त र.रु.20,000/- पर्यंत (अक्षरी र.रु.वीस हजार पर्यंत फक्त) खेळता निधी म्हणून अ श्रेणी गटास र.रु.20,000/-, ब श्रेणी गटास र.रु.18,000/- व क श्रेणी गटास र.रु.15,000/- अर्थ सहाय्य मिळण्यास तो गट पात्र असेल. |
10 |
गुणवत्ता वाढीसाठी खाजगी क्लासची फी देणेकामी अर्थसहाय्य (योजना क्र.10) |
आर्थिक उत्पन्न कमी असणार्या कुटुंबातील मुलींना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी खाजगी क्लासची फी देणेसाठी अर्थसहाय्य देणे. |
11 |
सावित्रीबाई फुले पुरस्कार वैयेक्तिक व्यक्तीस (योजना क्र.११) |
महिला व बाल व कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या समाज सेविकांच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्तींना त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरुन महिला व बालकांच्या उत्थानासाठी कार्यकर्त्या सरसावून पुढे याव्यात. या योजनेनुसार पुरस्कारासाठीच्या अर्जदार " महिला व बालकल्याणासाठी" झटणार्या "नामवंत समाज सेविका" असाव्यात. |
12 |
सावित्रीबाई फुले पुरस्कार (सामाजिक संस्थेस) (योजना क्र.12) |
महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या सामाजिक संस्थांच्या कामाची दाद घ्यावी व इतर सामाजिक संस्थांना त्यापासून प्रेरणा मिळावी. जेणेकरुन महिला व बालकांच्या प्रगतीसाठी सामाजिक संस्था सरसावून पुढे याव्यात. |
13 |
झोपटपट्टीमधील गरोदर/स्तनदा महिलेस खुराक भत्ता देणे (योजना क्र.13) |
महापालिका हद्दीतील झोपडपट्टीमध्ये वास्तव्य असलेल्या आर्थिकदृष्टा दुर्बल घटकातील गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांची पुरक पोषण आहाराची उणीव दुर करणे. |
14 |
नोंदणीकृत महिला संस्थांना पाळणाघर सुरु करण्याकरिता अर्थसहाय्य (यो.क्र.14) |
पाच वर्ष वयाच्या आतील बालके ज्यांचे पालक मजुरी किंवा नोकरी करीत असतील अशा आर्थिकदृष्टा दुर्बल घटकातील मुलांचे पालक कामावर गेल्यावर दिवसभर सांभाळण्यासाठी त्यांना पाळणाघरात ठेवले जाते अशा पाळणाघरांसाठी अर्थसहाय्य. |
15 |
उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या युवतीस अर्थसहाय्य (योजना क्र.15) |
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील युवतींना अधिकाधिक उच्च शिक्षणाच्या संधी उपवब्ध व्हाव्यात, आर्थिक अडचणींमुळे परदेशातील उच्च शिक्षण / अभ्यासक्रमासाठी, प्रशिक्षणासाठी निवड होवूनही त्यापासून वंचित राहू नये व अशा युवतींपासून इतरांना प्रोत्साहन मिळावे याकरिता आर्थिकदृष्टा दुर्बल घटकातील युवतीस अभ्यासक्रमास येणार्या खर्चापोटी जास्तीत जास्त र.रु.25,000/- ते र.रु.1,00,000/-(अक्षरी र.रु.एक लाख फक्त) पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येईल. |
16 |
12 वी नंतरचे वैद्यकीय,उच्च शिक्षण घेणार्या युवतींना अर्थसहाय्य (योजना क्र.16) |
12 वी नंतरचे वैद्यकीय(एम.बी.बी.एस.) अभियांत्रिकीचे, संगणक यासारखे पदवीपर्यंतच्या उच्च शिक्षणासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणार्या युवतींना अर्थसहाय्य. महापालिका हद्दीतील युवतींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होवून जास्तीत जास्त युवतींना उच्च शिक्षण घेता यावे याकरिता शैक्षणिक साहित्य खरेदीकरिता फक्त प्रथमवर्षी र.रु.5,000/- अर्थसहाय्य देण्यात येईल. |
17 |
पणन (विक्री) केंद्र (योजना क्र.17) |
नोंदणीकृत महिला संस्थेच्या सहकार्याने हा महापालिकेचा संयुक्त उपक्रम राहील. यामध्ये महिला मंडळे, विविध योजनाअंतर्गत लाभार्थींनी तयार केलेल्या वस्तुंच्या विक्री करिता सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. |
18 |
अंध,अस्थिव्यंग,मुकबधीर मतिमंद विद्यार्थी शिष्यवृत्ती (योजना क्र.18) |
अंध, अस्थिव्यंग, मुकबधीर, मतिमंद विद्यार्थ्यींना शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांची गुणवत्ता वाढीस लागावी तसेच शैक्षणिक उन्नती होण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे. |
19 |
अपंगांना मोफत चलन-वलन साधने वाटप (योजना क्र.19) |
अस्थिव्यंग,मुकबधिर,व्यक्ती / मुलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यंगामुळे येणार्या अडचणींवर मात करण्यासाठी कृत्रिम साधने वाटप करणे. |
20 |
विधवा/घटस्फोटित महिलांना व्यावसायासाठी अर्थसहाय्य (योजना क्र.20) |
विधवा/घटस्फोटित स्त्रियांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत व्हावी अथवा स्वयंरोजगार सुरु करुन त्यांचे स्वबळावर उपजीविकेचे साधन तयार करता यावे. |
21 |
मुक्तबंदींना व्यवसायासाठी अर्थसहाय्य (योजना क्र.21) |
मुक्तबंदी स्त्री-पुरुषांचे पुनर्वसान व्हावे, त्यांचे व्यवसायास मदत अथवा स्वयंरोजगारातून साधन तयार करुन उदरनिर्वाह करता यावा. |
22 |
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप (योजना क्र.22) |
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड व गुणवत्तेत वाढ व्हावी आणि त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे व उच्चशिक्षणासाठी सुविधा प्राप्त व्हावी म्हणून उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती या योजनेद्वारे देण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्यांना वार्षिक परिक्षेत तो शिकत असलेल्या इयत्तेत शे.60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे. |
23 |
इ.८ वी,१२ वी शिकणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप (योजना क्र.23) |
पिंपरी चिंचवड महागनरपालिकेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणार्या 8 वी ते 12 वी मध्ये शिकत असलेल्या मुलांना मोफत सायकल देण्यात येईल. |
24 |
मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांना घरबांधणीसाठी अर्थसहाय्य (यो.क्र.24) |
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत क्षेत्रातील झोपडपट्टीमध्ये आर्थिकदृष्टा दुर्बल आणि श्रमिक वर्गातील लोक राहतात. मागासवर्गीय नागरिकांनी पंजीकृत संस्था स्थापन करुन घरे बांधण्याची योजना कार्यान्वयीत केली असेल तर शासनाकडील मागासवर्गीय गृहनिर्माण योजना या सदराखाली घराच्या बांधकामाचा मर्यादित खर्च विचारात घेवून प्रत्येक सभासदास जास्तीत जास्त र.रु.25,000/- म.न.पा.सभा ठराव क्र.4753 दि.24.12.2002 घर बांधणेसाठी आर्थिक सहाय्य देवून त्यांचे राहणीमान सुधारावे. हा या योजनेचा हेतु आहे. |
25 |
मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांना घरदुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य करणे (योजना.क्र.२५) |
मागासवर्गीय घटकातील नागरिकांनी उभारण्यात आलेल्या घरकुलाची सुधारणा होवून त्यांचे रहाणीमान उंचवावे या हेतुने घराचे जुने सिमेंटपत्रे काढणे व नवीन पत्रे टाकणे, घराचे आतील व बाहेरील भागात सिमेट प्लॅस्टर करणे. पत्र्यावरील कमकुवत झालेल्या तुळया बदलणे. फरशी बंद करणे, स्नानगृहाची, संडासाची दुरुस्ती इ. कामे करुन घेण्यासाठी आर्थिक मदत करणे. |
26 |
उच्च शिक्षण घेणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणे (योजना क्र.26) |
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, त्यांना पाठपुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हा या योजनेचा हेतु आहे. यामध्ये ज्या विद्यार्थी/विद्यार्थीनीस शासनमान्य महाविद्यालयात 12 वी पास नंतर चालू शैक्षणिक वर्षात गुणानुक्रमाप्रमाणे (फ्री सीट) प्रवेश मिळाला आहे. अशा लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता येईल. आर्थिक सहाय्य जास्तीत जास्त वार्षिक र.रु.10,000/- (अक्षरी र.रु.दहा हजार फक्त) पर्यंत राहील. |
27 |
मागासवर्गीय विद्यार्थी,विद्यार्थीनी स्वयंरोजगाराकरीता संगणक प्रशिक्षण (योजना.क्र.27) |
महानगरपालिका हद्दीतील अनुसूचित जाती,जमाती,भटक्या-विमुक्त जाती व नवबौध्दमधील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरीता शासनमान्य संस्थेमार्फत संगणक प्रशिक्षण (MSCIT) |