व्यवसाय विषयक
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे मुख्यत्वे औद्योगिक शहर म्हणून विकसीत झालेले आहे. शहराची खरी औद्योगिक ओळख हि सन 1954 साली स्थापन झालेल्या हिंदुस्थान अँन्टीबोयाटिक्स लि. या औषध निर्मिती कारखान्याने झाली. दि. 04 मार्च 1970 रोजी स्व. अण्णासाहेब मगर यांनी सुरवातीला पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि भोसरी या चार गावांचा समावेश करुन नगरपालिकेची स्थापना केली. शहराचे औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय कंपन्यांसह टाटा मोटर्स, सॅण्डविक, एशिया, SKF, थरमॅक्स, क्रॉम्टन ग्रिव्हज, फोर्स मोटर्स, बजाज ऑटो, अँटलस कॉप्को, अल्फा लवाल, मार्शल महापालिकेने स्वतःचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्थापन केलेले असून त्यामाध्यमातून औद्योगिक क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झालेले आहे.