ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.२५/०७/१९ :
आज दिनांक २५/७/२०१९ रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील मिलिंदनगर पिंपरी, डांगे चौक,१६ नंबर बसस्टॉप थेरगाव, काळेवाडी फाटा,काळेवाडी डी मार्टसमोरील भाग, तापकीर चौक,कुणाल हॉटेल ते रहाटणी फाटा, रहाटणी फाटा ते डी मार्ट याठिकाणी अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे. तसेच रहाटणी फाटा ते डी मार्ट रोडवरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या १३ हातगाड्या हटविण्यात आल्या आहेत.
१) हातगाड्या ६
२) जाहिरात बोर्ड २
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी होमगार्ड चे १० कर्मचारी हजर होते